रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?
sushama andhare

रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?

| Updated on: Mar 28, 2026 | 11:42 AM

भोंदूबाबा अशोक खरात याच्या संदर्भात दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांची चौकशी का व्हावी याचे इनपुटस् आम्ही एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपूते यांना दिले असल्याचे शिवसेना उबाटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी नव्हतीच. तो त्यांच्या पक्षांतर्गत दबाव होता आणि प्रोसेसचा भाग होता असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. उद्या कदाचित त्यांना अटकच व्हायची असेल, जर पदावर असताना अटक झाली तर पक्षाची प्रतिमा अधिक डागाळेल, म्हणून त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याची शक्यता असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. मला जो काही कायदा कळतो त्यानुसार उद्या त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना अटक देखील केली जाऊ शकते असेही त्या म्हणाल्या. खरातला चाकणकर १२ ते १३ वर्षांपासून ओळखत होत्या असे त्यांनीच स्वत: सांगितले आहे. मुळात खरात सारख्या माणसाला पोसले कोणी ? त्याला बंदुकीचा परवाना देणारे लोक कोण होते? त्याच्या ट्रस्टला निधी देणारे लोक कोण याची चौकशी व्हायला हवी आहे.गेल्या १६ वर्षांपासून त्याचे हे प्रकार सुरु होते. १६ वर्षांपासून म्हणजे किती केसेस असतील. हजारो केसेस असतील.याचा तपास व्हायला हवा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना ते एमआयडीसीचीच्या प्रांगणात ते काय करीत होते. त्यांच्यासोबत एमआयडीसीचे कर्मचारी आहेत. त्यात एक मनकर्ण आवारे नावाची एक व्यक्ती आहे. ही व्यक्ती जगदंब पतसंस्थेची प्रमुख आहे. खरात याचा जगदंब पतसंस्थेशी आर्थिक व्यवहार आहे. चाकणकर सोबत सुद्धा हीच व्यक्ती दिसते आहे. त्यामुळे या आवारे यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंधारे यांनी केली.

Published on: Mar 28, 2026 11:40 AM
Follow Us