tv9 Marathi Special Report | अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध

tv9 Marathi Special Report | अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध

| Updated on: Apr 02, 2026 | 10:38 AM

इतिहासासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे जैन मुनी पद्मसागर यांच्या विरोधात जैन समाजातूनच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. त्यांच्या दाव्यांना अनेक जैन मुनींनी उघडपणे विरोध करत हे विधान निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, मराठी आणि जैन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही काहींनी केला आहे.

इतिहासासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे जैन मुनी पद्मसागर यांच्या विरोधात जैन समाजातूनच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. त्यांच्या दाव्यांना अनेक जैन मुनींनी उघडपणे विरोध करत हे विधान निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, मराठी आणि जैन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही काहींनी केला आहे. पद्मसागर यांनी केलेल्या दाव्यांमध्ये महाराणी ताराबाई जैन होत्या, असा उल्लेख असून हा दावा आता वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. विशेष म्हणजे, अनेक जैन मठांनीही हा दावा फेटाळून लावत पद्मसागर यांच्या वक्तव्यांवर टीका केली आहे. इतक्यावरच न थांबता पद्मसागर यांनी मेवाडच्या कुर्मादेवी जैन होत्या, महात्मा गांधी यांच्या आई जैन होत्या, तसेच मराठी भाषेची निर्मिती एका जैन व्यक्तीने केली, असेही दावे केले आहेत. “जैन हेच खरे मराठी” असे विधानही त्यांनी केले असल्याचे समोर आले आहे. या सर्व वक्तव्यांमुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली असून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Published on: Apr 02, 2026 10:38 AM
Follow Us