Eknath Khadse : …त्यांची आता लाडकी बायको योजना, उमेदवारीवरून खडसे आक्रमक, महायुतीवर गंभीर आरोप काय?

Eknath Khadse : …त्यांची आता लाडकी बायको योजना, उमेदवारीवरून खडसे आक्रमक, महायुतीवर गंभीर आरोप काय?

| Updated on: Nov 29, 2025 | 3:03 PM

जळगाव येथे बोलताना एकनाथ खडसे यांनी सत्ताधारी पक्षावर घराणेशाही, निधी वाटपावरून होणारी अडवणूक आणि महागाईवरून जोरदार टीका केली. त्यांनी लाडकी बायको योजना म्हणत सत्ताधाऱ्यांवर घराणेशाहीचा आरोप केला. जनतेच्या तिजोरीतील निधी रोखण्याच्या धोरणास खडसे यांनी माज संबोधले.

एकनाथ खडसे यांनी राज्य सरकार आणि सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर घराणेशाहीचा आरोप करत, गिरीश महाजन, सावकारे, आमदार किशोर पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट दिल्याचे नमूद केले. याला त्यांनी ‘लाडकी बायको योजना’ असे उपहासाने म्हटले, तर यापूर्वी ‘लाडकी बहीण योजने’तून मते मिळवल्याचे खडसेंनी जळगावात म्हणाले.

एकनाथ खडसे यांनी सरकारवर निधी वाटपावरूनही गंभीर आरोप केले. ‘मत नाही दिलं तर निधी देणार नाही, हा काय माज चाललाय?’ असा सवाल त्यांनी केला. निधी हा जनतेचा असून, तो रोखणे म्हणजे जनतेच्या पैशाची अडवणूक करणे असल्याचे ते म्हणाले. त्यांनी महागाईचा मुद्दाही उपस्थित केला, ज्यात गॅस सिलेंडर आणि खाद्यतेलाचे भाव वाढल्याने सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचे नमूद केले. तसेच, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना पक्षात घेऊन वॉशिंग मशीनद्वारे स्वच्छ केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

Published on: Nov 29, 2025 03:03 PM