Jay Pawar | बारामती पोटनिवडणुकीवर जय पवार यांची प्रतिक्रिया; निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान

Jay Pawar | बारामती पोटनिवडणुकीवर जय पवार यांची प्रतिक्रिया; निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान

| Updated on: Apr 04, 2026 | 4:47 PM

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते, अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी बारामती पोटनिवडणूक, पवार कुटुंब आणि विमान अपघात अहवालावर प्रतिक्रिया दिली आहे. बारामती पोटनिवडणुकीबाबत बोलताना जय पवार म्हणाले, “विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर काय निर्णय घेतील हे सर्वांना माहिती आहे.”

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते, अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी बारामती पोटनिवडणूक, पवार कुटुंब आणि विमान अपघात अहवालावर प्रतिक्रिया दिली आहे. बारामती पोटनिवडणुकीबाबत बोलताना जय पवार म्हणाले, “विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर काय निर्णय घेतील हे सर्वांना माहिती आहे.” अजित पवारांशिवाय निवडणूक लढवण्याबाबत विचारले असता, “असं कधी कल्पनाही केली नव्हती,” असे ते भावनिक होऊन म्हणाले. पत्रकार परिषद पुढे ढकलण्याबाबत ते म्हणाले की, “जे मुद्दे मांडायचे होते ते रोहित पवार यांनी आधीच मांडले आहेत. अंतिम अहवाल येईपर्यंत मी अधिक बोलणार नाही.” विमान अपघाताच्या चौकशीवर त्यांनी प्रश्न उपस्थित करत जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत ते म्हणाले की, “हा निर्णय वरिष्ठ नेते घेतील.” अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Published on: Apr 04, 2026 04:47 PM
Follow Us