Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, ‘हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा’
मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांचे राजकीय प्यादे आणि सेवक असल्याचा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. जरांगे यांच्या उपोषणापूर्वीच त्यांना अटक करावी, अशी मागणी सदावर्ते यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. जरांगे हे अतिरेकी आणि देशद्रोही भाषा वापरत असून, ते आंदोलक नसून समाजात विघटन निर्माण करणारी व्यक्ती आहेत, असे सदावर्तेंनी म्हटले आहे. या […]
मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांचे राजकीय प्यादे आणि सेवक असल्याचा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. जरांगे यांच्या उपोषणापूर्वीच त्यांना अटक करावी, अशी मागणी सदावर्ते यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. जरांगे हे अतिरेकी आणि देशद्रोही भाषा वापरत असून, ते आंदोलक नसून समाजात विघटन निर्माण करणारी व्यक्ती आहेत, असे सदावर्तेंनी म्हटले आहे.
या आरोपांवर पलटवार करत गंगाधर काळकुटे यांनी गुणरत्न सदावर्ते यांना थेट आव्हान दिले आहे. काळकुटे यांनी सदावर्तेंना उद्देशून म्हटले, “अरे सदावर्ते, तुझ्यात हिंमत आहे तर तू ये ना अटक करायला. पहिले पोलीस संरक्षण सोडून बाहेर फिरा”, असा इशारा गंगाधर काळकुटे यांनी दिलाय.
Published on: Aug 28, 2026 10:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
