Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…

Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…

| Updated on: Aug 10, 2026 | 4:04 PM

रायगडच्या कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावातील शाळकरी विद्यार्थ्यांनी गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा उपक्रम केला आहे. रस्त्यांची समस्या मांडण्यासाठी या विद्यार्थिनी थेट ‘फिल्ड रिपोर्टर’ बनल्या असून, हातात छत्रीचा माईक घेऊन त्यांनी गावातील रस्त्यांची पाहणी करत प्रशासनाच्या कारभाराची पोलखोल केली.

गावातील रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे, ठिकठिकाणी साचलेले चिखलाचे डबके आणि त्यामुळे निर्माण होणारी अपघाताची शक्यता विद्यार्थिनींनी कॅमेऱ्यासमोर मांडली. पावसाळ्यात या रस्त्यांची अवस्था आणखी बिकट होत असून, शाळेत ये-जा करताना विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी आपल्या रिपोर्टमधून दाखवून दिले.

विशेष म्हणजे, हातात छत्री आणि त्याच छत्रीचा माईक म्हणून वापर करत या शाळकरी मुलींनी थेट घटनास्थळावरून ‘फिल्ड रिपोर्टिंग’ केली. त्यांच्या या अनोख्या रिपोर्टिंगमधून गावातील रस्त्यांची वास्तविक परिस्थिती समोर आली आहे.

रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिक आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात आली आहे. शाळकरी मुलींच्या या अनोख्या फिल्ड रिपोर्टिंगचा संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा.

Published on: Aug 10, 2026 4:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us