EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर दगडफेक! नेमकं घडलं काय?

EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर दगडफेक! नेमकं घडलं काय?

| Updated on: May 27, 2026 | 4:53 PM

केरळमध्ये ईडीच्या कारवाईदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचं समोर आलं आहे. CPI (M) कार्यकर्त्यांनी ईडीच्या वाहनांवर हल्ला करत मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना घडली आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी ईडीच्या गाड्यांच्या काचांवर दगडफेक करत वाहनांचे नुकसान केले. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केरळचे माजी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या कुटुंबाशी संबंधित आयटी कंपनीमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीचे अधिकारी कारवाई करण्यासाठी संबंधित ठिकाणी पोहोचले होते. मात्र ही कारवाई सुरू होताच CPI (M) कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी ईडीच्या पथकाला विरोध करत वाहनांवर हल्ला चढवला.

दरम्यान, या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला आणि सरकारी कारवाईला विरोध केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: May 27, 2026 4:53 PM
Follow Us