सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क… वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
केतन अग्रवालच्या वडिलांनी मुलाच्या लग्नासाठी कोट्यवधी खर्च केल्याच्या अफवा फेटाळल्या आहेत. उदयपूरमध्ये केवळ एक छोटे हॉटेल बुक केले होते आणि मोठ्या खर्चाचा प्रश्नच नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले. केतनला फसून लोहगडावर नेण्यात आले होते, तर सियाच्या नावाचा टॅटू त्याने तिला सरप्राईज देण्यासाठी गोंदवला होता असेही त्यांनी सांगितले.
केतन अग्रवाल प्रकरणात, त्याच्या लग्नासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याच्या अफवांना केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. उदयपूरमध्ये लग्नाचे नियोजन होते, मात्र त्यासाठी केवळ एक छोटे हॉटेल बुक केले होते आणि अद्याप कसलेही मोठे पैसे दिले नव्हते, असे विशाल अग्रवाल यांनी स्पष्ट केले. फक्त एक छोटी ॲडव्हान्स रक्कम दिल्याचे त्यांनी नमूद केले.
कोट्यवधी रुपयांचा खर्च किंवा कोट्यवधींचे सोने खरेदी करण्याच्या चर्चा या पूर्णपणे चुकीच्या आणि निराधार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. या प्रकरणात, केतनला फसून लोहगडावर नेण्यात आले होते अशी माहिती विशाल अग्रवाल यांनी दिली. तसेच, सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने तिच्या नावाचा टॅटू मानेच्या मागील बाजूस गोंदवून घेतला होता हेही समोर आले आहे. माही जय नावाचे इन्स्टाग्राम अकाउंट सिया आणि चेतन चौधरी चालवत होते आणि त्याद्वारे केतनला सरप्राईज देण्याचे नाटक रचले गेले होते, असेही त्यांनी सांगितले. सियाने रचलेल्या कटामुळे केतनची जीव गेल्याचा आरोपांवरून चौफेर टीका होत आहे आणि लग्नाच्या खर्चाबाबतच्या अफवांवर अग्रवाल कुटुंबीयांनी स्पष्टीकरण दिले आहे.
