सगळीकडे पाणीच पाणी! पुण्यात हाहाकार… मुसळधार पावसामुळे 27 हजार 100 क्युसेकने विसर्ग सूरु
राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुठा नदीवरील खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा देण्यात आला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खडकवासला धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. वाढता पाणीसाठा लक्षात घेऊन धरण प्रशासनाने मुठा नदीपात्रात 27 हजार 100 क्युसेक वेगाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने नदीची पातळी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.