Khalid Ka Shivaji : ‘खालिद का शिवाजी’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात, का होतोय विरोध अन् वाद नेमका काय?
निषेध करणाऱ्या हिंदू संघटनांचं म्हणणं आहे की 'खालिद का शिवाजी' मध्ये निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करत आहेत. त्यांचा आरोप आहे की या चित्रपटाद्वारे समाजात जातीय तणाव आणि फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणूनच ते चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.
महाराष्ट्रात ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सोमवारी संध्याकाळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या राज्य चित्रपट पुरस्कार कार्यक्रमात, या चित्रपटाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली, ज्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांचे भाषण मध्येच थांबवावे लागले. या घटनेनंतर, पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या निषेधाची ही एकमेव घटना नाही. गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटना या चित्रपटावर आपला रोष व्यक्त करत आहेत. हिंदू महासंघाने थेट सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवून आपला आक्षेपही व्यक्त केला आहे. चित्रपटाच्या कथेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर केली जात असल्याचा आरोप या संघटनांचा आहे. बघा ‘खालिद का शिवाजी‘ चित्रपटावरुन वाद नेमका काय?
