तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय;  यादीत तुमचे नाव तर नाही ना?

तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय; यादीत तुमचे नाव तर नाही ना?

| Updated on: May 11, 2026 | 6:01 PM

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना राज्य सरकारकडून दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेचा मोठा फायदा सरकारला झाला. महायुती सरकारला महिलांनी जोरदार मतदान करत पुन्हा सत्तेत आणले.

मध्यंतरी चर्चा होती की, लाडकी बहीण योजना बंद होईल. मात्र, त्यानंतर सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि योजनेचा लाभ महिलांना मिळत राहील. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही नियम आणि अटी सरकारने लागू केल्या होत्या. या अटींनुसार अनेक बहिणींना अपात्र ठरवण्यात आलं. या संबंधात पडताळणीची अंतिम प्रक्रिया पूर्ण झाली असून ६६ लाख बहिणींना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे सरकारची दहा हजार कोटींची बचत होते. या पडताळणीत १ कोटी ७७ लाख बहिणी पात्र ठरल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे याच महिन्यात मार्च आणि एप्रिलचे अनुदान मिळणार आहेत, अशी चर्चा आहे.

Published on: May 11, 2026 06:01 PM
Follow Us