लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण

| Updated on: Sep 14, 2026 | 11:07 AM

मुंबईचा राजा, लालबागचा राजा, यंदाच्या 93 व्या गणेशोत्सवासाठी सज्ज आहे. शिव शंकर थीमवर आधारित देखावा पाहण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे. दर्शनासाठी 24 तासांहून अधिक काळ रांगेत उभ्या असलेल्या भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबई पोलीस आणि मंडळाचे कार्यकर्ते गर्दी नियंत्रणासाठी तैनात आहेत.

गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे. यंदा लालबागच्या राजाचे 93 वे वर्ष असून, शिव शंकर या थीमवर आधारित देखावा भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. लालबाग मार्केटसह संपूर्ण परिसरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळतेय. कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकापासूनच दर्शनाच्या रांगा सुरू झाल्या आहेत. गेल्या 24 तासांहून अधिक काळ अनेक भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते.

पहाटे 5:30 वाजता दर्शनाला सुरुवात झाली असून, सकाळी एक वाजता राजाची पहिली आरती पार पडणार आहे. गणेशोत्सवाची सुरुवात लालबागच्या राजाच्या दर्शनाने करावी, अशी अनेक भक्तांची इच्छा असते. त्यामुळे मुंबईतूनच नव्हे, तर राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल झाले आहेत. मुंबई पोलीस आणि लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भाविकांना सुरक्षित दर्शन देण्यासाठी चोख बंदोबस्तात तैनात आहेत.

Published on: Sep 14, 2026 11:07 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us