थेट निखाऱ्याने चटका द्यायचा…लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारात सापडल्या धक्कादायक वस्तू

थेट निखाऱ्याने चटका द्यायचा…लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारात सापडल्या धक्कादायक वस्तू

| Updated on: Jun 03, 2026 | 4:45 PM

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धा आणि धागेदोरे यांसारख्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच पुन्हा लातूरमधील एका बाबाचा दरबार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धा आणि धागेदोरे यांसारख्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच पुन्हा लातूरमधील एका बाबाचा दरबार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. लातूर जिल्ह्यात, एका कथित भोंदूने एक दरगाह दरबार चालवलं होतं, जिथे आजार बरे करण्याच्या नावाखाली लोकांना जळते निखारे देणे, ताईत बांधणे आणि मंत्र-तंत्र करणे असे प्रकार केले जात होते. या उपायांनी अत्यंत गंभीर आजारही बरे होतील, असा दावा केला जात होता. इतकेच नाहीतर बाबा भयंकर आर्थिक लूट करायचा. त्याच्याकडे एक दर पत्रक देखील सापडलं आहे. आता हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील दरग्यामध्ये हा प्रकार चालवला जात होता. शारीरिक आणि मानसिक आजारांवर उपचारासाठी मोठ्या संख्येने लोक येत असत, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. यावेळी धागे-दोरे अशा अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस पुढील तपास करत असून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Published on: Jun 03, 2026 4:45 PM
Follow Us