अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?

अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Jul 16, 2026 | 2:09 PM

मोठी अपडेट समोर आली आहे, न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत शरद पवार आणि पवार कुटुंबाला मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या याचिकेत शरद पवार, सुप्रिया सुळे आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह इतरांविरोधात FIR दाखल करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.

बराच काळ चर्चेत असलेल्या, लावासा प्रकरणी याचिकाकर्त्याने लवासा प्रकल्पासाठी जमीन खरेदी आणि विविध परवानग्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. तसेच या प्रकरणाची CBI किंवा इतर यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली होती.

मात्र, याचिकेतील मुद्द्यांनी समाधान व्यक्त केले नाही, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या हेतूबाबत शंका व्यक्त केली. “याचिकाकर्त्याच्या हेतूबद्दल शंका आहे. आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही,” असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

या निर्णयामुळे लवासा प्रकरणात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. तसेच पवार कुटुंबाला या निकालामुळे मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

Published on: Jul 16, 2026 2:02 PM
Follow Us