ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते… लक्ष्मण हाके बोलता बोलता हे काय म्हणाले?
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या मंत्र्यांना ओबीसी मतदार मत देणार नाहीत, असा इशाराही हाके यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ओबीसी आरक्षणावर चर्चेसाठी लवकरच बैठक होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याचा आरोप हाके यांनी केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ज्या ज्या मंत्र्यांनी जरांगेंसोबत बैठका घेतल्या, ते धुळीस मिळाले आहेत.” लक्ष्मण हाके यांनी सरकार मराठा समाजाला बेकायदेशीरपणे कुणबी ठरवून ओबीसीमध्ये घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला. यामुळे ओबीसी समाजाचे संविधानिक आरक्षण धोक्यात आले आहे. हाके यांनी जरांगे यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्यांना “अणपड नेतृत्व” म्हटले आणि त्यांच्या उपोषणाच्या पद्धतीवरही टीका केली.
ओबीसी समाजाचे आरक्षण सुरक्षित ठेवण्यासाठी आपण लढत राहू असे हाके यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत लवकरच या विषयावर चर्चा होणार आहे. चर्चेतून तोडगा न निघाल्यास ओबीसी समाजाला एकत्रित करून रस्त्यावर उतरण्याचे किंवा मतपेटीद्वारे न्याय मिळवण्याचे संकेत त्यांनी दिले.
