VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 11 June 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 11 June 2022

| Updated on: Jun 11, 2022 | 1:49 PM

निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत संतापले आहेत. राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना जोरदार प्रहार केलाय. त्यांनी या पराभवाचे खापर थेट अपक्षांवरच फोडले आहे. काही घोडे बाजारात नेहमीच असतात फक्त हरभरे टाकले की ते कुठेही जातात. जिकडे हरभरे तिकडे घोडे नेहमीच असतात.

निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत संतापले आहेत. राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना जोरदार प्रहार केलाय. त्यांनी या पराभवाचे खापर थेट अपक्षांवरच फोडले आहे. काही घोडे बाजारात नेहमीच असतात फक्त हरभरे टाकले की ते कुठेही जातात. जिकडे हरभरे तिकडे घोडे नेहमीच असतात. अशाच काही घोड्यांनी या निवडणूकीमध्ये दगाबाजी केली. त्यामुळे आमच्या उमेदवाराचा पराभव केला. या आमदारांची यादी आमच्याकडे आहे. आम्ही त्यांना पाहून घेऊ, असा थेट इशाऱ्याच राऊत यांनी दिलाय. आघाडीसोबत असलेल्या अपक्षांची मते फुटली असली तरी आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. घोडेबाजारातील घोड्यांमुळे कोणताही परिणाम होत नाही.

Published on: Jun 11, 2022 01:49 PM