MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 17 October 2021

| Updated on: Oct 17, 2021 | 8:24 AM

छापेमारीसाठी अजितदादांच्या बहिणींच्या घरी 5 दिवस 14 ते 15 लोकं छापेमारीसाठी गेले होते. त्यांचं वागणं वाईट होतं असं नाही. त्याबद्दल काही तक्रारही नाही. पण त्यांच्या हाती काही लागलं नाही तरीही त्यांना तिथे थांबवण्यात आलं. ते बिचारे शांतपणे पुढील आदेश येईपर्यंत बसून राहिले. आता मध्यमवर्गीय माणसाच्या घरी असं पाच-पाच दिवस येऊन राहणं किती योग्य आहे? असा सवाल पवारांनी केलाय.

Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. काही ठिकाणी ही छापेमारी आठवडाभर चालली. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. राजकीय आकसानं चौकशी सुरु असल्याचा आरोप पवारांनी केलाय.

अजित पवारांच्या बहिणींच्या घरी जाऊन आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. पाच दिवस या धाडी चालल्या. त्यानंतर तिथे जाऊन मी चौकशी केली. अधिकाऱ्यांनी मागितलेली कागदपत्रं पाहिली. त्यातून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. छापेमारीसाठी अजितदादांच्या बहिणींच्या घरी 5 दिवस 14 ते 15 लोकं छापेमारीसाठी गेले होते. त्यांचं वागणं वाईट होतं असं नाही. त्याबद्दल काही तक्रारही नाही. पण त्यांच्या हाती काही लागलं नाही तरीही त्यांना तिथे थांबवण्यात आलं. ते बिचारे शांतपणे पुढील आदेश येईपर्यंत बसून राहिले. आता मध्यमवर्गीय माणसाच्या घरी असं पाच-पाच दिवस येऊन राहणं किती योग्य आहे? असा सवाल पवारांनी केलाय.