जामीन मंजूर झाला असला तरिही अनिल देशमुखांना तुरंगातच राहवं लागणार. काय आहे कारण? पहा महाफास्ट न्यूज 100

| Updated on: Oct 04, 2022 | 4:07 PM

राज्यातील 7 कोटी रेशनकार्ड धारकांना शिंदे सरकारने दिवाळी गिफ्ट दिलं आहे. यावेळी रेशनकार्ड धारकांना 100 रूपयांची दिवाळी पॅकेज दिलं आहे. ज्यात 1 किलो तेल, साखर, रवा आणि चना डाळ असणार आहे.

Follow us on

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. तब्बल 11 महिन्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र ईडीकडून याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. तर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला असला तरिही त्यांना तुरंगातच राहवं लागणार आहे. कारण त्यांना CBI केसमध्ये अजूनही जामीन मिळालेला नाही. यादरम्यान जामीन मिळाल्याची माहिती मिळताच देशमुखांच्या घरच्यांनी जल्लोष केला आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी सत्यमेव जयते असे म्हटलं आहे. तर पत्राचाळ प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील 7 कोटी रेशनकार्ड धारकांना शिंदे सरकारने दिवाळी गिफ्ट दिलं आहे. यावेळी रेशनकार्ड धारकांना 100 रूपयांची दिवाळी पॅकेज दिलं आहे. ज्यात 1 किलो तेल, साखर, रवा आणि चना डाळ असणार आहे. तर शिवतिर्थावरील दसरा मेळावा हा महाविकास आघाडीचा आहे. बाळासाहेबांचे विचार हे बीकेसी मैदानावर ऐकायला मिळतील असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.