Devendra Fadnavis | अर्थसंकल्प मांडताना फडणवीस अजित पवारांबद्दल काय म्हणाले? केली मोठी घोषणा

Devendra Fadnavis | अर्थसंकल्प मांडताना फडणवीस अजित पवारांबद्दल काय म्हणाले? केली मोठी घोषणा

| Updated on: Mar 06, 2026 | 2:47 PM

महाराष्ट्र राज्याचा 2026-27चा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री आणि माजी अर्थमंत्री अजित पवार यांची आठवण केली.

महाराष्ट्र राज्याचा 2026-27चा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री आणि माजी अर्थमंत्री अजित पवार यांची आठवण केली. फडणवीस म्हणाले की, “हे भाषण करताना माझे मन अत्यंत जड झाले आहे. राज्याचे लाडके नेते अजित दादा आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनावर आणि प्रशासनावर एक भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.” मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अजित पवार यांनी एकूण ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला असून, त्यांचे अर्थसंकल्पाशी असलेले नाते अत्यंत दृढ होते. त्यांच्या काटकसरीशीर शिस्तीमुळे महाराष्ट्राची वित्तीय स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली. फडणवीस यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून सर्व मान्यवरांशी चर्चा करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा आजच्या अर्थसंकल्प अधिवेशनात केली.

Published on: Mar 06, 2026 02:47 PM
Follow Us