गजानन देवकते प्रकरण: थकलेल्या बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, विजय वडेट्टीवारांनी सरकारवर साधला निशाणा.
मुंबई: नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकते यांच्या आत्महत्येनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. थकीत बिलांमुळे छोट्या कंत्राटदारांवर जीवन संपवण्याची वेळ येत असल्याचा आरोप त्यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले, “शेतकरी टोकाचं पाऊल उचलतो, विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलतो आणि आता कंत्राटदारही टोकाचं पाऊल उचलू लागला आहे. या राज्यात कोणीही सुरक्षित राहिलेला नाही.” […]
मुंबई: नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकते यांच्या आत्महत्येनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. थकीत बिलांमुळे छोट्या कंत्राटदारांवर जीवन संपवण्याची वेळ येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
वडेट्टीवार म्हणाले, “शेतकरी टोकाचं पाऊल उचलतो, विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलतो आणि आता कंत्राटदारही टोकाचं पाऊल उचलू लागला आहे. या राज्यात कोणीही सुरक्षित राहिलेला नाही.” देवकते यांचे सुमारे 2 कोटी रुपयांचे बिल दोन वर्षांपासून थकीत असल्याची माहिती देत त्यांनी छोट्या कंत्राटदारांची देयके तातडीने देण्याची मागणी केली.
यावेळी त्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणावरही निशाणा साधत, मोठ्या प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपये उपलब्ध होतात; मात्र 25 लाख ते 2 कोटी रुपयांची कामे करणाऱ्या छोट्या कंत्राटदारांची बिलं अडकून पडतात, अशी टीका केली. दरम्यान, देवकते यांच्या निधनानंतर कंत्राटदार महासंघाने आठ दिवसांत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
