चकित करणारे आकडे समोर, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्तीत कोटींची भर

चकित करणारे आकडे समोर, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्तीत कोटींची भर

| Updated on: May 02, 2026 | 10:46 AM

सध्या राज्यभरात विधान परिषदेचंच वारं वाहत आहे. महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी त्यांचे उमेदवार रिंगणात उभे केले असून काही नावांची यामध्ये खूप जास्त चर्चा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन वर्षात या सर्वांच्या संपत्तीत किती वाढ झाली याचा मोठा आकडा समोर आला आहे.

सध्या राज्यभरात विधान परिषदेचंच वारं वाहत आहे. महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी त्यांचे उमेदवार रिंगणात उभे केले असून काही नावांची यामध्ये खूप जास्त चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटातून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची वर्णी लागली, तर राष्ट्रवादीतून झिशान सिद्दिकी यांना जागा मिळाली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून अंबादास दानवे यांना जागा मिळाली आहे, तर यामुळे काँग्रेस काहीशी नाराज झाल्याचंही सांगितलं जात होतं. अखेर काँग्रेसकडूनही अंबादास दानवेंना पाठिंबा मिळाला. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन वर्षात या सर्वांच्या संपत्तीत किती वाढ झाली याचा मोठा आकडा समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबादास दानवे यांच्या संपत्तीत गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. इतर पक्षांतील नेत्यांच्या संपत्तीतही वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. नीलम गोऱ्हेंच्या संपत्तीत सहा वर्षांत दहापट वाढ झाली आहे, तर झिशान सिद्दिकी यांच्या संपत्तीत दोन वर्षांत चारपट वाढ झाली आहे.

Published on: May 02, 2026 10:46 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us