BMC Election Results 2026 : ‘डॅडी’ अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2026 च्या निकालांमध्ये अनेक धक्कादायक घडामोडी समोर आल्या आहेत. मुंबईत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने तब्बल 130 जागा जिंकल्या, तर अरुण गवळींच्या दोन्ही कन्या गीता गवळी आणि योगिता गवळी पराभूत झाल्या. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2026 च्या निकालांचे चित्र आता स्पष्ट होत आहे. मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेने एकूण 130 जागा जिंकून मोठा विजय संपादन केला आहे. हा गेल्या 25 वर्षांनंतरचा ऐतिहासिक बदल मानला जात आहे. या निवडणुकीत काही प्रमुख उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यात अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली गीता गवळी (प्रभाग क्रमांक 212) आणि योगिता गवळी (प्रभाग क्रमांक 207) यांचा समावेश आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना अरुण गवळींनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता, मात्र मुंबईकरांनी त्यांना पसंती दिली नाही. पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 25 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांचाही पराभव झाला आहे. काही दिवसांपासून त्या पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. मुंबईतील प्रभाग क्रमांक 168 मधून राष्ट्रवादीच्या सईदा खान विजयी झाल्या आहेत.
