Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार? मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक सुरु

| Updated on: Apr 11, 2021 | 5:49 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्स' ची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक सुरू आहे. Maharashtra Lockdown Uddhav Thackeray

Follow us on

मुंबई:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्स’ ची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चा आढावा या बैठकीत घेतला आहे. लसीकरण आणि लॉकडॉऊनवर चर्चा बैठकीदरम्यान होणार आहे. डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ मध्ये मुंबईसह राज्यातील नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे. डॉ .डी वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय ओक, हिंदुजा रुग्णालयाचे डॉ झहीर उडवाडिया लिलावती रुग्णालय, डॉ . नागांवकर, वोक्हार्ट रुग्णालयाचे केदार तोरस्कर , फोर्टीस रुग्णालयाचे डॉ.राहुल पंडित,लोकमान्य टिळक रुग्णालयाचे शिव डॉ . एन.डी. कर्णिक , पी . ए .के. रुग्णालयाचे डॉ . झहिर विरानी , केईएम रुग्णालयाचे डॉ . प्रविण बांगर, कस्तुरबा रुग्णालयाचे डॉ. ओम श्रीवास्तव हे या टास्क फोर्समध्ये आहेत.