Maharashtra MLC Result 2026 Complete Overview : 70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी

Maharashtra MLC Result 2026 Complete Overview : 70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी

| Updated on: Oct 27, 2026 | 8:39 AM

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला आता काही मिनिटांत सुरुवात होणार आहे. महायुतीचे सतीश चव्हाण यांना महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेनेचे दिलीप घुगे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील यांचे आव्हान आहे. सतीश चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून मतांच्या विभाजनाची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला आता काही मिनिटांत सुरुवात होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार सतीश चव्हाण चौथ्यांदा रिंगणात उतरले आहेत. चव्हाण यांनी यापूर्वी १८ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दिलीप घुगे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापसिंह पाटील हे दोघेही मैदानात आहेत. यामुळे महाविकास आघाडीची मते विभागली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सतीश चव्हाण हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, त्यांना महायुतीतर्फे उमेदवारी मिळाली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत चव्हाण यांनी ५८,००० मतांनी विजय मिळवला होता. मात्र, यावेळी प्रतापसिंह पाटील यांनी जोरदार प्रचार केल्यामुळे लढत अधिक चुरशीची झाली आहे. मतमोजणीनंतरच कोण बाजी मारणार हे स्पष्ट होईल. एकूण १३ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी ७० टेबलांवर होणार आहे.

Published on: Oct 27, 2026 8:39 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us