Maharashtra Rain Alert | राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने आज अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. विशेषतः पश्चिम घाट परिसर, महाबळेश्वर घाट परिसर आणि पुणे घाट परिसरात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय पालघर, ठाणे, रायगड आणि धुळे जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती, दरड कोसळण्याचा धोका आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईतही दिवसभर जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून शहरासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नाशिक जिल्ह्यासाठी पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून 2,498 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.