Rohit Pawar | येत्या काळात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार; रोहित पवार यांचं सूचक विधान

| Updated on: Feb 07, 2026 | 11:58 AM

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, विविध मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उत्तर पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. आमदार रोहित पवार यांनी पिंपळी गावात आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, विविध मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उत्तर पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. आमदार रोहित पवार यांनी पिंपळी गावात आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले, “दादांचे स्वप्न होते की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवडून यावेत. आज मागे वळून पाहताना असं वाटतं की, तेच त्यांचं अंतिम स्वप्न होतं. आज मी माझ्या संपूर्ण परिवारासोबत येऊन मतदान केलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की मतदार आणि कार्यकर्ते दादांचं स्वप्न नक्की पूर्ण करतील.”

ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांची इच्छा होती की पवार कुटुंब एकत्र यावं. त्या दृष्टीने दादांकडूनही सातत्याने प्रयत्न केले जात होते. “सुप्रिया ताई असोत किंवा पवार साहेब, आम्ही सर्वजण एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील होतो. आज कोणतीही नियोजन न करता संपूर्ण परिवार एकत्र आला आहे. पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येताना दिसत आहे,” असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, शरद पवार, पार्थ पवार आणि रोहित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या संदर्भात बोलताना रोहित पवार म्हणाले की, “त्या भेटीत आमच्यात भावनिक चर्चा झाली. येत्या काळात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. मात्र अजित दादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.” सुनेत्रा पवार यांच्याविषयी बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘सुनेत्रा काकींकडे बघत असताना, त्या परिवाराचा एक भाग म्हणून सुनेत्रा काकींमध्ये मी अजित काकांना बघतो त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीसह आणि राष्ट्रीय अध्यक्ष हे पद मिळणं, अशी मनोमन इच्छा रोहित पवार यांनी बोलून दाखवली.

Published on: Feb 07, 2026 11:58 AM