Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?

Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?

| Updated on: Oct 06, 2026 | 5:25 PM

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत दोन उमेदवार रिंगणात उतरल्याने पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे मंगेश चिवटे आणि भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मते चिवटेंच्या उमेदवारीवर चर्चा झाली, तर फडणवीसांनी अद्याप एकमत झाले नसल्याचे म्हटले आहे. यामुळे कोण माघार घेणार याकडे लक्ष लागले आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी अर्ज दाखल केला आहे, तर भाजपकडून कौस्तुभ गावडे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे महायुतीचे दोन उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत, जे आघाडीसाठी डोकेदुखी ठरत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील वरिष्ठांशी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सुनेत्रा पवार यांच्यासोबत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीबद्दल चर्चा झाल्याचे म्हटले आहे. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, शिवेसेनेने चिवटेंना एबी फॉर्म दिला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, चर्चा झाली असली तरी अद्याप एकमत झालेले नाही आणि पुन्हा चर्चा होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरले असून, आता महायुतीच्या नेत्यांकडून अंतिम निर्णय अपेक्षित आहे. काँग्रेसचे जयंत आजगावकर महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या शिक्षक मतदारसंघात कोण माघार घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Oct 06, 2026 5:25 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us