भुजबळ की आणखी कोणी..? राज्यसभा निवडणुकीत धक्कातंत्र होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष

भुजबळ की आणखी कोणी..? राज्यसभा निवडणुकीत धक्कातंत्र होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष

| Updated on: Jun 06, 2026 | 12:21 PM

राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी महायुतीत मोठ्या हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे.

राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी महायुतीत मोठ्या हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू झाली असून या बैठकीला छगन भुजबळ, पार्थ पवार आणि दिलीप वळसे पाटील उपस्थित आहेत. राज्यसभेचा उमेदवार निश्चित करण्यासाठी ही बैठक होत असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील ही जागा भाजपला मिळेल की राष्ट्रवादीला याबाबत राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठी घोषणा करत दुपारी 3 वाजेपर्यंत पक्षाचा उमेदवार अर्ज भरणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचंही बोललं जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी अंतिम निर्णय बैठकीनंतर जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 06, 2026 12:21 PM
Follow Us