Video | ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट…

Video | ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट…

| Updated on: Jul 08, 2026 | 8:37 PM

पश्चिम बंगालच्या राजकारणात आधीच मोठ्या उलथापालथी घडत आहेत. अशात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतःच्या पक्षातील एका कार्यकर्त्याला कानशीलात लगावल्याचं दिसत आहे.

कोलकात्यात तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी आणि युवा संघटनेच्या रॅलीदरम्यान काही ठिकाणी गोंधळ आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते जखमी झाले होते. त्यानंतर जखमींना रुग्णालयात पाठवण्यासाठी ममता बॅनर्जी स्वतः कोलकात्यातील कालीघाट येथील निवासस्थानाबाहेर उपस्थित होत्या.

त्या कार्यकर्त्यांना रस्ता मोकळा करण्याच्या सूचना देत होत्या, जेणेकरून वाहने सहजपणे जाऊ शकतील. याच दरम्यान त्यांच्या मागे उभा असलेला एक कार्यकर्ता सुरक्षा कवच तयार करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी ममता बॅनर्जी अचानक नाराज झाल्या आणि त्यांनी संबंधित कार्यकर्त्याला कानशीलात लागावलं आहे. या प्रकरणावर अद्याप पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Published on: Jul 08, 2026 8:34 PM
Follow Us