Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या… छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!

Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या… छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!

| Updated on: Aug 05, 2026 | 4:48 PM

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. या प्रमाणपत्रांच्या वैधतेची तपासणी सुरू असताना अनेक लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे अवैध ठरण्यास सुरुवात झाली असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या राजकीय भवितव्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

परभणी जिल्हा परिषदेच्या सदस्या कोमल पारवे, छत्रपती संभाजीनगरच्या ज्योती शिंदे, बीडच्या रेखा अंबुरे तसेच गंगापूरच्या नगरसेविका वर्षा गायकवाड यांच्या कुणबी प्रमाणपत्रांवर कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित प्रमाणपत्रे अवैध ठरत असल्याने या लोकप्रतिनिधींना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, कुणबी प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत सुरू असलेल्या कारवाईमुळे राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांमध्ये चिंता वाढली असून, आगामी काळात आणखी काही प्रकरणांवर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 05, 2026 4:48 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us