ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लिपबाबत नवा दावा केला आहे. या वादग्रस्त क्लिपचे मूळ डिव्हाइस शिवसेना नेते रामदास कदमांकडे असल्याचा आरोप जरांगेंनी केला. त्यांच्या मते, कदमांनी ही क्लिप त्यांच्या आधी वाजवली होती. जरांगेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही या घडामोडींमागे असल्याचा ठपका ठेवला.
ऑडिओ क्लिप समोर आणून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता आणखी एक मोठा दावा केला आहे. ज्या ऑडिओ क्लिपवरून नवा वाद निर्माण झाला आहे, तिचे मूळ डिव्हाइस शिवसेना नेते रामदास कदमांकडे असल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे. “माझ्या आधी रामदास कदमांकडे ऑडिओ क्लिप होती”, असे जरांगेंनी म्हटले. कदमांनीच ती क्लिप माझ्या आधी दोन तास वाजवली होती, असा दावाही त्यांनी केला.
जरांगेंनी यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांना पूर्वी असा नाद नव्हता, पण गेल्या दोन-तीन महिन्यांत तो लागला असल्याचा दावा जरांगेंनी केला. तर फडणवीस साहेबांना पुढे न येता गोष्टी घडवून आणण्याचा नाद पूर्वीपासूनच होता, असे ते म्हणाले. या ऑडिओ क्लिपमध्ये कथितरित्या श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगेंना ५०० कोटी देण्याचा उल्लेख होता. मराठवाड्यात जरांगेंचा प्रभाव वाढत असल्याने त्यांच्या विरोधात लोक उभे करण्याची चर्चा होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्लिपची फॉरेन्सिक चौकशी करण्याची घोषणा केली आहे.
