Chhagan Bhujbal : जहां नहीं चैना वहा नही रहेना… म्हणणारे भुजबळ पुन्हा मंत्री झाले, शपथ घेताच जरांगेंचा दादांना इशारा

Chhagan Bhujbal : जहां नहीं चैना वहा नही रहेना… म्हणणारे भुजबळ पुन्हा मंत्री झाले, शपथ घेताच जरांगेंचा दादांना इशारा

| Updated on: May 21, 2025 | 8:38 AM

अखेर छगन भुजबळांना मंत्रीपद मिळालं आणि भुजबळांची नाराजी दूर झाली. पण भुजबळ मंत्री होताच जरांगेंनी अजित पवारांना किंमत चुकवावी लागेल असा थेट इशारा दिला.

अखेर छगन भुजबळांचा काल राजभवनात शपथविधी झाला आणि भुजबळ कॅबिनेट मंत्री झाले. अचानक भुजबळांचा एकट्याचा शपथविधी झाल्याने राजकीय वर्तुळातही भुवया उंचावल्यात. मात्र जहा नही चैना वहॉ नही रेहना असं म्हणणारे भुजबळ आता ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं असं म्हणताहेत. महायुतीच सरकार आल्यानंतर भुजबळांचा पत्ता कट झाला. त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आणि थेट अजित पवारांवरही टीकेचे बाण सोडले जात होते. दरम्यानच्या काळात फडणवीसांच्या दोनदा भेटीगाठीही झाल्या पण अखेर अजित पवारांनीच त्यांना मंत्रीपद दिलं. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं आणि इकडे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा त्यांच्यावर निशाणा साधला. अजित पवारांना किंमत चुकवावी लागेल, असा इशाराच जरांगेंनी अजित पवारांना दिला. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही भुजबळांना मंत्रिमंडळात घेतल्याने टीका केली. अडीच वर्ष जेलमध्ये जाऊन आलेलेच जनतेच्या डोक्यावर थोपवले असं दमानिया म्हणाल्या. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 21, 2025 08:38 AM