Avinash Jadhav | मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान

| Updated on: Apr 24, 2026 | 5:25 PM

मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत वकील गुणरत्न सदावर्ते यांना थेट आव्हान दिलं आहे. “जर सदावर्ते एका बापाची औलाद असतील, तर त्यांनी 4 मे रोजी मीरा भाईंदरमध्ये यावं; त्यांचं चॅलेंज मी स्वीकारलं आहे,” असं जाधव यांनी स्पष्टपणे म्हटलं.

दरम्यान, मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षा आणि टॅक्सी चालक आंदोलन करणार असल्याच्या दाव्यावरही जाधव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी सांगितलं की, अधिकृत आरटीओ आकडेवारीनुसार मुंबई महानगर प्रदेशात (MMR) सुमारे 4 लाख 10 हजार रिक्षा आहेत. “मग 15 लाखांचा आकडा कुठून आला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यासोबतच, “या रिक्षाचालकांपैकी सुमारे 65 टक्के चालक हे मराठी आहेत. मुंबईतील काही भाग वगळता ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली या भागांत मोठ्या प्रमाणावर मराठी रिक्षाचालक आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं. जाधव यांनी पुढे दावा केला की, जे बाहेरील चालक रिक्षा चालवतात, त्यांचे परमिटही बहुतांश मराठी मालकांच्या नावावर आहेत. “15 लाखांचा आकडा हा केवळ महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्यासाठी पुढे केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाला आणखी धार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Apr 24, 2026 05:25 PM
Follow Us