मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने…आगीचं कारण काय?

मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने…आगीचं कारण काय?

| Updated on: Jun 16, 2026 | 3:56 PM

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील दांगट पाटील नगर येथे पञ्याच्या शेडमधील टाइल्स आणि कागदी डिश बनवणाऱ्या दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन्ही दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर काही मिनिटांतच आगीने मोठे रूप धारण केले. टाइल्स दुकानासह पेपर डिश तयार करणाऱ्या दुकानातील साहित्य जळून खाक झाले. आगीच्या तीव्रतेमुळे शेजारील रहिवाशी इमारतींनाही झळा बसल्या. अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या घटनेबाबत अग्निशमन दल अधिकारी वसंत भिलारे यांनी माहिती दिली असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे.

Published on: Jun 16, 2026 3:56 PM
Follow Us