MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा

MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा

| Updated on: Jul 28, 2026 | 12:51 PM

NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशभर गाजलेल्या परीक्षा वादाच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील MHT-CET 2026 परीक्षेबाबतही घोटाळ्याचे आरोप समोर आले होते. विरोधकांनी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा दावा केल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणावर CET सेलने अधिकृत भूमिका स्पष्ट करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महादेव बालगुडे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर एका शिक्षकाचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये MHT-CET 2026 परीक्षेत कथित गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. दरम्यान, CET सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर करण्यात येणारे दावे दिशाभूल करणारे असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. बोर्ड परीक्षेतील गुण आणि CET परीक्षेतील पर्सेंटाईल यांची थेट तुलना करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सरदेसाई म्हणाले की, अनेक विद्यार्थी बारावीच्या परीक्षेपेक्षा CET परीक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे बोर्डाच्या तुलनेत CET मध्ये त्यांची कामगिरी अधिक चांगली असू शकते. तसेच ‘टक्केवारी (Percentage)’ आणि ‘पर्सेंटाईल (Percentile)’ या दोन पूर्णपणे वेगळ्या मूल्यांकन पद्धती असून त्यांची तुलना करता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पर्सेंटाईल पद्धतीचे स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, एखाद्या बॅचमधील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 100 पर्सेंटाईल दिले जाते. याचा अर्थ त्या विद्यार्थ्याला 100 टक्के गुण मिळाले असा नसून, तो त्या बॅचमधील सर्वोच्च कामगिरी करणारा विद्यार्थी आहे, एवढाच त्याचा अर्थ होतो.

याशिवाय, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर CET सेलकडून अंतर्गत विश्लेषण सुरू करण्यात येणार असून त्यानंतर आवश्यक निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही सरदेसाई यांनी दिली. दरम्यान, सोशल मीडियावर परीक्षेबाबत कथित दिशाभूल करणारे दावे प्रसारित केल्याप्रकरणी CET सेलने आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून राज्य सायबर विभागाकडेही चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

Published on: Jul 28, 2026 12:51 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us