Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

| Updated on: Sep 22, 2026 | 5:46 PM

मिरा-भाईंदरमधील तपोवन विद्यालयात एका विद्यार्थ्याला डब्यात मेथीची भाजी आणल्याने 50 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. शाळेतील बहुतांश विद्यार्थी जैन समाजाचे असल्याने प्रवेशावेळी काही सूचना दिल्या जातात, असे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याविरोधात तक्रार केल्यानंतर पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेला नोटीस बजावली आहे.

मिरा-भाईंदरमधील तपोवन विद्यालयात एका विद्यार्थ्याला डब्यात मेथीची भाजी आणल्याने 50 रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे मीरा-भाईंदरमध्ये काय चालले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शाळेतील बहुतांश विद्यार्थी जैन समाजाचे असल्याने प्रवेशावेळीच मांसाहार आणि कंदमुळे न आणण्याच्या सूचना दिल्या जातात, असा शाळेवर आरोप आहे. विद्यार्थ्याने मेथीची भाजी आणल्याने त्याला दंड आकारण्यात आला. या प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी रॉबर्ट डिसोझा यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर मीरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेला नोटीस बजावली आहे.

कोणी काय खावे किंवा खाऊ नये, हे ठरवण्याचा अधिकार कोणत्याही शाळा प्रशासनाला नाही, असे रॉबर्ट डिसोझा यांनी म्हटले आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांवर कारवाई होत असेल, तर सरकारने शाळेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या घटनेमुळे शाळा प्रशासनाच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

Published on: Sep 22, 2026 5:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us