चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारलं अन्… खळबळजनक व्हिडीओ व्हायरल
काही काळापूर्वीच भारतातील पहलगाम येथे घडलेल्या घटनेने देशभरातील नागरिकांना धक्का बसला होता आणि रागही अनावर झाला होता. अशीच घटना मुंबईच घडल्याचं सांगितलं जात आहे.
काही काळापूर्वीच भारतातील पहलगाम येथे घडलेल्या घटनेने देशभरातील नागरिकांना धक्का बसला होता आणि रागही अनावर झाला होता. अशीच घटना मुंबईच घडल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबईतील मीरा रोड परिसरात सोमवारी पहाटे घडलेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका इमारतीत तैनात असलेले सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो रमेश सेन यांच्यावर एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख ३१ वर्षीय जैब झुबेर अन्सारी अशी पटवली आणि अवघ्या दीड तासात त्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्याने इमारीती खाली उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. चाकूने भोसकण्यापूर्वी त्याचे नाव आणि धर्म विचारला होता. पोलीस सध्या या आरोपांची चौकशी करत असून, या घटनेत कोणताही ठोस जातीय पैलू असल्याचे अद्याप अधिकृतपणे निश्चित केलेले नाही, मात्र हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
