Sandeep Deshpande | राजसाहेबांवर बोलण्याची तुमची लायकी नाही, मनसेने मिटकरींची लायकी काढली

Sandeep Deshpande | राजसाहेबांवर बोलण्याची तुमची लायकी नाही, मनसेने मिटकरींची लायकी काढली

| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 7:49 AM

दीड दमडीच्या लोकांनी राज साहेबांबद्दल बोलू नये आणि त्यांची तेवढी लायकीसुद्धा नाही, अशी घणाघाती टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलीय. मिटकरींच्या टीकेला देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं.

ज्यांच्या पक्षाचा नाव राष्ट्रवादी आहे, जे महाराष्ट्रामध्ये अतिशय संकुचित जाती जातीचं राजकारण करत आहेत. त्यांच्याकडून आम्हाला काहीच शिकायची गरज नाही. ज्यांनी महाराष्ट्रात जाती-जातीत विष पेरण्याचं कामं केलं आहे, ते खरं महाराष्ट्रद्रोही आणि ह्या दीड दमडीच्या लोकांनी राज साहेबांबद्दल बोलू नये आणि त्यांची तेवढी लायकीसुद्धा नाही, अशी घणाघाती टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलीय. मिटकरींच्या टीकेला देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं.