Sandeep Deshpande | तुम करो तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला?; मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
चंद्रपुरमध्ये भाजपशी युती केल्यावर मनसेने ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आरोप केला की, ठाकरेंच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले गेले आहेत. संदीप देशपांडे यांनी आपल्या वक्तव्यात संजय राऊत यांना लक्ष्य करत म्हणाले, “संजय राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का?” तसेच केडीएमसीचा संदर्भ देत राऊतांसह ठाकरे सेनेवरही निशाणा साधला.
चंद्रपुरमध्ये भाजपशी युती केल्यावर मनसेने ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आरोप केला की, ठाकरेंच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले गेले आहेत. संदीप देशपांडे यांनी आपल्या वक्तव्यात संजय राऊत यांना लक्ष्य करत म्हणाले, “संजय राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का?” तसेच केडीएमसीचा संदर्भ देत राऊतांसह ठाकरे सेनेवरही निशाणा साधला. संदीप देशपांडे यांनी सांगितले की, “तुम्ही कराल ते चालते, ते योग्य आहे. पण दुसऱ्यांनी केल्यावर ‘राजू पाटील भाजपला विकले गेले आहेत’ असा आरोप करणे योग्य नाही.” “संजय राऊत यांना अंधारात ठेवलं तर त्यांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधली, हे पाहावं. ‘तुम करो तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला’ असं कसं चालेल?”
Published on: Feb 12, 2026 02:09 PM
