काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला जोरात आपटलं, कारण…

काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला जोरात आपटलं, कारण…

| Updated on: May 21, 2026 | 3:40 PM

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळनेर गावात अवघ्या 22 दिवसांच्या नवजात बाळाला त्याच्या जन्मदात्या आईने रागाच्या भरात जमिनीवर आपटल्याची घटना उघड झाली आहे. बाळ सतत रडत असल्याने संतापलेल्या आईने हे अमानुष कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकारात निष्पाप बाळाच्या उजव्या हाताच्या मनगटाला आणि दंडाच्या हाडाला गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांनी फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट केले आहे. जखमी बाळावर सध्या उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, ही घटना घरातील आजीमुळे समोर आली. स्वतःच्या मुलीने केलेला हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या आजीनेच कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणानंतर पोलिसांनी संबंधित आईविरोधात गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे मातृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Published on: May 21, 2026 3:40 PM
Follow Us