दहावीच्या परीक्षेचं हॉलतिकीट आजपासून ऑनलाईन मिळणार

दहावीच्या परीक्षेचं हॉलतिकीट आजपासून ऑनलाईन मिळणार

| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 9:33 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यंदा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावटातून हळू हळू मुक्त होत असताना यावेळी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यंदा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दहावी आणि बारावीची प्रवेशपत्र शाळा आणि महाविद्यालयात देण्यात येत होती. बारावीची प्रवेशपत्र देण्यास यापूर्वी सुरुवात झालेली आहे. दहावीची प्रवेशपत्र (SSC Admit Card) आजपासून देण्यात येणार आहेत.