Ramesh Pardeshi : राज ठाकरेंनी खडसावलेल्या मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाईनं भाजपात प्रवेश करताच म्हटलं, RSS माझ्या…
राज ठाकरे यांनी मनसेचे पदाधिकारी रमेश परदेशी, जे मुळशी पॅटर्न चित्रपटातील पिट्याभाई नावाने ओळखले जातात, त्यांना संघाच्या गणवेशातील एका फोटोवरून सवाल केला होता. त्यांनी नुकताच भाजपात प्रवेश केलाय.
मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाई म्हणजेच अभिनेते रमेश परदेशी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. यापूर्वी संघाच्या गणवेशात फोटो पोस्ट केल्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांना सुनावलं होतं. त्यावर रमेश परदेशी यांनी स्पष्टीकरण दिले की, दसरा संचलनाचा तो फोटो होता आणि संघाचा माझ्या संस्कारांवर प्रभाव आहे. राज ठाकरे हे कुटुंबप्रमुख असल्याने त्यांचे बोलणे खेळाडू वृत्तीने स्वीकारतो, असे त्यांनी सांगितले. कुठल्याही परिस्थितीत आपल्या विचारासोबत राहिले पाहिजे, असे त्यांना वाटत असल्याचेही परदेशी यांनी म्हटले.
Published on: Nov 19, 2025 2:02 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
