Vijay Wadettiwar | मुंबई महापालिकेतील निधी वाटपावरून वाद; महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले

Vijay Wadettiwar | मुंबई महापालिकेतील निधी वाटपावरून वाद; महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले

| Updated on: Apr 10, 2026 | 10:36 AM

मुंबई महानगरपालिकेतील विकास निधीच्या वाटपावरून राजकारण तापले असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी आरोप केला की, विकास निधीच्या वाटपात मोठी तफावत दिसून येत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ठाकरे गटाच्या नगरसेवकांना केवळ 2 लाख रुपयांचा निधी दिला जात आहे. तर शिंदे गटाच्या नगरसेवकांना 20 कोटी, 50 लाख, 25 लाख अशा मोठ्या रकमा दिल्या जात आहेत. “यालाच समतोल विकास म्हणायचं का?

मुंबई महानगरपालिकेतील विकास निधीच्या वाटपावरून राजकारण तापले असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी आरोप केला की, विकास निधीच्या वाटपात मोठी तफावत दिसून येत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ठाकरे गटाच्या नगरसेवकांना केवळ 2 लाख रुपयांचा निधी दिला जात आहे. तर शिंदे गटाच्या नगरसेवकांना 20 कोटी, 50 लाख, 25 लाख अशा मोठ्या रकमा दिल्या जात आहेत. “यालाच समतोल विकास म्हणायचं का? फक्त आपल्या नगरसेवकांनाच निधी देण्याची पद्धत महाराष्ट्रात कधीच नव्हती,” अशी टीका त्यांनी केली. यापूर्वीच्या सरकारांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, निवडणुका संपल्यानंतर राजकारण बाजूला ठेवून सर्व भागांच्या विकासासाठी समान निधी देण्याची परंपरा होती. मात्र सध्या विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना निधी नाकारला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “विरोधी आहेत म्हणून त्यांच्या मतदारसंघाचा विकासच करायचा नाही, ही पद्धत योग्य आहे का?, हे आता जनता ठरवेल,” असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यानंतर मुंबईतील विकास निधी वाटपावरून राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Published on: Apr 10, 2026 10:36 AM
Follow Us