ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर

ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर

| Updated on: Aug 29, 2026 | 2:48 PM

मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. चिंचपोकळीचा चिंतामणीसह अनेक गणेश मंडळांचे बाप्पा परळ वर्कशॉपमधून मार्गस्थ झाले. हजारो गणेश भक्त बाप्पांच्या आगमनासाठी रस्त्यांवर जमले असून, लालबाग-चिंचपोकळी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. मंडळांनी अनेक महिन्यांच्या नियोजनानंतर भव्य देखाव्यांसाठी तयारी केली आहे.

मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. अनेक गणेश मंडळांच्या गणपती बाप्पांचा आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात अनुभवता येत आहे. हजारो गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. विशेषतः चिंचपोकळी आणि लालबाग परिसरात गणेश भक्तांची प्रचंड गर्दी उसळली आहे. या सोहळ्यादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. परळमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या घटनेमुळे, आता विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. परळ वर्कशॉपमधून एकेक गणपती मूर्ती मंडळांकडे नेण्यासाठी मार्गस्थ होत आहेत.

बाप्पाच्या आगमन सोहळ्याला गणेश भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसून येत आहे. मुंबईमधील रस्ते गणेश भक्तांनी अक्षरशः फुलून गेले आहेत. लालबाग-परळ या मराठमोळ्या भागात गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतची तयारी अनेक महिन्यांपासून केली जाते. मंडळांची मेहनत आणि नियोजन यामुळेच गणेश भक्तांना निर्विघ्नपणे बाप्पाचे दर्शन घेता येते. उंचच उंच मूर्ती आता मंडळांमध्ये पोहोचत असून, देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

Published on: Aug 29, 2026 2:48 PM
Follow Us