Mumbai | मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
मातोश्री येथे ठाकरे गटाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी ठाकरे गटाची शिवसेना उमेदवार देणार, हे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मुंबईची महापौर निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे निश्चित झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या 11 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच, आज मातोश्री येथे ठाकरे गटाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी ठाकरे गटाची शिवसेना उमेदवार देणार, हे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मुंबईची महापौर निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे निश्चित झाले आहे. या निर्णयामुळे आगामी महापौर निवडणुकीत राजकीय चुरस वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान, ठाकरे गटाच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी महापौर निवडणुकीत एकत्र येणार का?, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असणार?, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Feb 05, 2026 04:53 PM
