प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!

प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!

| Updated on: Jun 09, 2026 | 6:52 PM

मुंबईकरांची मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली असून घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सोमवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि काळ्या ढगांसह जोरदार वाऱ्यांना सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच रिमझिम पावसाच्या सरी कोसळू लागल्या. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांनी पावसाचा आनंद घेतला. घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भांडुप परिसरात रस्ते ओलेचिंब झाले होते. काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला होता. कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांची मात्र थोडी तारांबळ उडाली.

हवामान विभागाने पुढील 48 तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सूनच्या आगमनामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आता सर्वांचे लक्ष पुढील पावसाकडे लागले आहे.

Published on: Jun 09, 2026 6:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us