मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मुंबईतील मागाठाणे परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर बुधवारी मोठा अपघात झाला. या अपघातात 5 कार आणि 1 बस एकमेकांवर आदळल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना बोरीवली पूर्व येथील मागाठाणे परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
अपघातामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.