पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीनं केलं अजब कृत्य, मुंबईतील घटनेनं राज्य हादरलं
राज्यभरात गुन्हेगारीच्या घटनांची संख्या वाढतच चालली आहे. कित्येक ठिकाणी वादामुळे, नात्यांमुळे तर कुठे अमानवीयतेने कोणाच्या ना कोणाच्या जिवावर माणूसच उठत आहे. मात्र अशा गुन्हेगारीच्या घटना मुंबईत घडणं चिंताजनक आहे. काही काळापूर्वीच एका महिलेने नवऱ्याची हत्या करून निळ्या ड्रममध्ये भरलं होतं. याच घटनेची पुनरावृत्ती मुंबईत झाली, फक्त प्रकार थोडा वेगळा होता.

मुंबईतील मुंब्र्यात राहणाऱ्या महिलेनं स्वतःच्या नवरा आणि भावासोबत मिळून प्रियकराची हत्या केली. यानंतर तिने त्याचा मृतदेह नीळ्या ड्रममध्ये भरला आणि गटारीत फेकला. अरबाज मकसुद अली खान असं मृताचं नाव असून अनेक दिवसांपासून पोलिस या हत्या प्रकरणाचा मागमूस काढत होते. अखेर सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित प्रकरणातील महत्त्वाच्या गोष्टींचा तपास करत पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला पकडलं. अज्ञात मृतदेहाचा तपास करताना पोलिसांना या गंभीर प्रकरणाची माहिती मिळाली होती.
हे प्रकरण उघड होताच पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.