ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर जाऊन घेतली भेट

ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर जाऊन घेतली भेट

| Updated on: May 18, 2026 | 6:04 PM

शिवसेना UBT गटाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चांना वेग आला आहे. नागेश पाटील आष्टीकर हे मुंबईतील नंदनवन या निवासस्थानी शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

या भेटीनंतर पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील काही खासदार हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत होत्या. काही खासदार लवकरच पक्षांतर करू शकतात, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी अशा सर्व चर्चा फेटाळून लावत कोणताही पक्षप्रवेश होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

तरीदेखील नागेश पाटील आष्टीकर यांच्या भेटीमुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आष्टीकर यांनी माध्यमांना सांगितलं की, ही भेट फक्त सदेच्छा भेट असून ठाकरेंची साथ सोडणार नाहीत.

Published on: May 18, 2026 06:03 PM
Follow Us