Nagpur | नागपूरमध्ये पोलिसांची अचानक धाड, लॅपटॉप, वाय-फाय जप्त, नेमकं काय घडलं? शहरात खळबळ

Nagpur | नागपूरमध्ये पोलिसांची अचानक धाड, लॅपटॉप, वाय-फाय जप्त, नेमकं काय घडलं? शहरात खळबळ

| Updated on: Apr 24, 2026 | 11:31 AM

नागपूरमध्ये क्रिकेट सट्टेबाजीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत सात बुकींना अटक केली आहे. नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रँचने गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई राबवली. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री आयपीएलच्या सीएसके विरुद्ध एमआय यांच्यातील सामन्यावर सट्टा लावला जात होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छावणी परिसरात छापा टाकला.

नागपूरमध्ये क्रिकेट सट्टेबाजीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत सात बुकींना अटक केली आहे. नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रँचने गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई राबवली. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री आयपीएलच्या सीएसके विरुद्ध एमआय यांच्यातील सामन्यावर सट्टा लावला जात होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छावणी परिसरात छापा टाकला. या कारवाईदरम्यान सात जण वेगवेगळ्या ग्राहकांसोबत ऑनलाइन पद्धतीने सट्टा खेळताना आढळून आले. घटनास्थळावर लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून लॅपटॉप, वाय-फाय आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. या प्रकरणामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भात क्रिकेट सट्टेबाजीचं मोठं जाळं कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, या नेटवर्कमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे.

 

Published on: Apr 24, 2026 11:31 AM
Follow Us